कोरोनाचे नवे ६ रुग्‍ण; सध्या घेताहेत १९ जण उपचार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, १ ऑक्टोबरला कोरोनाचे नवे ६ रुग्ण समोर आले असून, सध्या १९ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 697 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 691 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 6 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, १ ऑक्‍टोबरला कोरोनाचे नवे ६ रुग्‍ण समोर आले असून, सध्या १९ रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 697 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 691 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 217 तर रॅपिड टेस्टमधील 474 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
लोणार तालुका : नागझरी 1, मातमळ 1, जळगाव जामोद शहर : 1, बुलडाणा शहर : 3
एकूण बाधितांचा आकडा 87571 वर
आजपर्यंत 718907 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86879 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 559 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87571 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.