कोरोनाचा एक रुग्‍ण आढळला, तीन रुग्णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 सप्टेंबरला कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला असून, तो बुलडाणा शहरातील जुना गावात आढळला आहे. दिवसभरात तीन रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला. सध्या रुग्णालयात 20 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 865 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 864 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 सप्‍टेंबरला कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्‍ण समोर आला असून, तो बुलडाणा शहरातील जुना गावात आढळला आहे. दिवसभरात तीन रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज मिळाला. सध्या रुग्‍णालयात 20 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 865 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 864 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 222 तर रॅपिड टेस्टमधील 642 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 715666 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86868 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 697 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87561 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.