कुठे किती पडलाय पाऊस जाणून घेऊया… जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी!; शेतीचे प्रचंड नुकसान; वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गत् 24 तासांत जिल्ह्यात काही भागांचा अपवाद वगळता धुव्वाधार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाहतुकीसह सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुलडाणा तालुक्यात गत 24 तासांत पावसाने कहर केलाय! तालुक्यात काही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात काही भागांचा अपवाद वगळता धुव्वाधार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाहतुकीसह सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बुलडाणा तालुक्यात गत 24 तासांत पावसाने कहर केलाय! तालुक्यात काही भागांत ढगफुटी सदृश्य पावसाची आशंका वर्तविण्यात येत आहे. यातही पाडळी महसूल मंडळात विक्रमी 126 मि.मी. पावसाची नोंद झाली. साखळी पट्ट्यातही अतिवृष्टी झाली असून, मंडळात 79 मि.मी. इतका धोधो पाऊस बरसला. या पावसाने बुलडाणा तालुक्यात कहर केलाय! याशिवाय मोताळा व नांदुरा तालुक्यात 48 मि.मी.पेक्षा जास्त पावसाने हजेरी लावत धिंगाणा घातला.

असा झालाय पाऊस अन्‌ अतिवृष्टी…
संग्रामपूर तालुक्‍यात २४.७ मि.मी., चिखली २९.७ (चांधई मंडळात अतिवृष्टी, ६५.३ मि.मी. पाऊस), बुलडाणा तालुक्‍यात ८९.७ मि. मी. (बुलडाणा मंडळात अतिवृष्टी ८८.८, रायपूर मंडळात अतिवृष्टी ९५.५ मि.मी., धाड मंडळात अतिवृष्टी ७५.५ मि.मी., पाडळी मंडळात अतिवृष्टी ८९.५ मि. मी., साखळी मंडळात अतिवृष्टी ११२.८ मि.मी., देऊळघाट मंडळात अतिवृष्टी ११२ मि. मी. पाऊस), मोताळा तालुक्‍यात ४८.६ मि. मी. (धामणगाव बढे मंडळात अतिवृष्टी ७०.८ मि. मी. पाऊस), नांदुरा तालुक्‍यात ४८.१ मि. मी. (निमगाव मंडळात अतिवृष्टी ६७.३ मि.मी.), देऊळगाव राजा तालुक्‍यात ४५.० मि.मी., मेहकर २६.४ मि.मी., सिंदखेडराजा १६.२ मि. मी., लोणार १५.१ मि. मी., खामगाव ३६.४ मि. मी., शेगाव ३३.३ मि. मी. तर मलकापूर 28 मिलिमीटर, जळगाव जामोद तालुक्यात २८.८ मि. मी. पाऊस झाला आहे.