उंदीर मारण्याचे औषध पिऊन वृद्धाने संपवले आयुष्य!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्यामुळे ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना खामगाव शहरातील वामननगरात १३ ऑगस्टला घडली. उपचारादरम्यान वृद्धाचा १४ ऑगस्टला मध्यरात्री दीडच्या सुमारास मृत्यू झाला. श्रीराम रावजी महाकाळे असे या वृद्धाचे नाव असून, त्यांच्यावर विदर्भ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणी डॉ. गुलाब पवार …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्यामुळे ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्‍यू झाला. ही घटना खामगाव शहरातील वामननगरात १३ ऑगस्‍टला घडली. उपचारादरम्‍यान वृद्धाचा १४ ऑगस्‍टला मध्यरात्री दीडच्‍या सुमारास मृत्‍यू झाला. श्रीराम रावजी महाकाळे असे या वृद्धाचे नाव असून, त्‍यांच्‍यावर विदर्भ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणी डॉ. गुलाब पवार यांच्‍यातर्फे कक्षसेवक पवन रहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.