अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून खामगाव शहर पोलिसांनी वाहनासह एक ब्रास रेती जप्त केली. ३ लाख ५ हजार रुपयांची ही कारवाई खामगाव शहरातील तलाव रोड भागात आज, ५ सप्टेंबरच्या पहाटे १ च्या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली.वाहनचालक शुभम पुरुषोत्तम हवालदार (२१, रा. माटरगाव, ता. शेगाव) व वाहनमालक …
Sep 5, 2021, 21:48 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून खामगाव शहर पोलिसांनी वाहनासह एक ब्रास रेती जप्त केली. ३ लाख ५ हजार रुपयांची ही कारवाई खामगाव शहरातील तलाव रोड भागात आज, ५ सप्टेंबरच्या पहाटे १ च्या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली.
वाहनचालक शुभम पुरुषोत्तम हवालदार (२१, रा. माटरगाव, ता. शेगाव) व वाहनमालक रामा शिवाजी मिरगे (२४, रा. भास्तन, ता. शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे टिप्परमध्ये १ ब्रास रेती घेऊन चालले होते. त्यांनी शासनाची रॉयल्टी भरली नव्हती. या चोरट्या वाहतुकीची गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक सम्राट ब्राह्मणे यांनी पोलिसांनी टिप्पर पकडले. तपास पोहेकाँ गजानन जोशी करत आहेत.