अल्पवयीन मुलीने घेतला गळफास;बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना आज, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास नांद्राकोळी (ता. बुलडाणा) येथे समोर आली. तिने आत्महत्या केली तेव्हा तिचे आई-वडील बुलडाण्याला कामानिमित्त आले होते. आश्विनी राजू काळवाघे (रा. नांद्राकोळी, ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिला एक भाऊही आहे. दुपारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गळफास घेऊन १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना आज, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास नांद्राकोळी (ता. बुलडाणा) येथे समोर आली. तिने आत्‍महत्‍या केली तेव्हा तिचे आई-वडील बुलडाण्याला कामानिमित्त आले होते.

आश्विनी राजू काळवाघे (रा. नांद्राकोळी, ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिला एक भाऊही आहे. दुपारी घरी कुणी नसताना तिने घरातील टिनाखालील लाकडी बल्लीला गळफास घेतला. ही बाब शेजारच्यांचा लक्षात येताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत आश्विनीच्‍या आत्महत्येचे कारण समोर आले नव्हते.