अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना किन्ही महादेव (ता. खामगाव) येथे काल, रात्री ८ वाजता घडली.श्रीकृष्ण सारंगधर तिवाणे(४४,रा किन्ही महादेव,ता खामगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
श्रीकृष्ण तिवाने यांनी काही दिवसांपूर्वी २ एकर शेती विकत घेतली होती,मात्र आतापर्यंत शेतीची खरेदी झालेली नव्हती.यंदा अपुऱ्या पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यामुळे ते चिंतेत रहात होते.काल रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी किन्ही महादेव शिवारातील बाळू बाप्पा कराडकर यांच्या शेतात निबांच्या झाडाला गळफास घेतला.तिवाने यांच्या पश्यात पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.आत्महत्येचे नेमके कारण वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे.