अमडापूर पोलिसांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे भोवले; गुन्हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमडापूर पोलिसांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनायक आबदाने या फेसबुक वापरकर्त्याने अमडापूर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये पोलिसांना शिविगाळही करण्यात आली होती. ही बाब ठाणेदारांचे लेखनिक म्हणून काम करणारे गजानन राजपूत यांनी ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना सांगितली. पोलिसांनी पोस्टकर्त्या व्यक्तीचा मोबाइल नंबर मिळवून त्याला …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अमडापूर पोलिसांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विनायक आबदाने या फेसबुक वापरकर्त्याने अमडापूर पोलिसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये पोलिसांना शिविगाळही करण्यात आली होती. ही बाब ठाणेदारांचे लेखनिक म्हणून काम करणारे गजानन राजपूत यांनी ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना सांगितली.

पोलिसांनी पोस्टकर्त्या व्यक्तीचा मोबाइल नंबर मिळवून त्याला फोन केला असता, “हो मीच विनायक आबदाने. मीच ती पोस्ट टाकली. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. मी बीएसएफमध्ये आहे. घरी आलो की तुम्हाला पाहून घेईन’, अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. याबाबतची तक्रार अमडापूर पोलीस ठाण्यात पोकाँ गजानन राजपूत यांनी दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांचा अवमान केल्याच्या कारणावरून विनायक आदबाने या फेसबूक वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.