वारे "झेडपी" चे..!सामाजिक, राजकीय वारसा असलेल्या सौ अनिता येवले ईसोलीतून इच्छूक! शिवसेना उबाठा पक्षाने संधी दिल्यास जि. प. निवडणूक लढणार
Updated: Sep 23, 2025, 18:00 IST
ईसोली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून उभेच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. सामाजिक, राजकीय वारसा असलेल्या शिवसेना चिखली तालुका महिला आघाडी प्रमुख सौ अनिता येवले ईसोली जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोने करुन ईसोलीत शिवसेनेची मशाल पेटवू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
शेतकरी कुटुंबातील अनिता येवले सामाजिक कार्यात नेहमीचअग्रेसर असतात. त्यांचे पती गोविंद येवले हे राजर्षी शाहू मल्टीस्टेट को- ऑप. सोसायटीमध्ये मेहकरचे विभागीय व्यवस्थापक पदी कार्यरत आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला होता. उबाठाचे जिल्हा समन्वयक तथा निवडणूक प्रमुख संदीप शेळके यांचे ते अतिशय निकटवर्तीय मानले जातात. सौ अनिता येवले यांचे आजन सासरे स्व. रामकृष्ण येवले ईसोलीचे पहिले पोलीस पाटील होते. धाकटे सासरे दामोदर येवले हे खरेदी विक्री महासंघाचे संचालक तथा माजी सरपंच आहेत. सासरे गजानन येवले सध्या तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. गावातील प्रत्येक समाजातील परिवारासोबत सौ अनिता येवले यांचा जनसंपर्क चांगला आहे. कुणाच्याही सुख- दुःखात धावून जातात. सामाजिक कार्यक्रम, सण, उत्सव, पक्षीय आंदोलनात सक्रिय सहभागी होतात. महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन सोडवणूक करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. त्यामुळे नारीशक्तीचा आवाज मिनी मंत्रालयात पोहचवण्यासाठी सर्कलमधील महिलांनी सौ अनिता येवले यांना पहिली पसंती दिली आहे. या पार्श्वभूमीवर इसोली सर्कलमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून जि. प. सर्कल निवडणूक लढण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. पक्षातील कुणी वरिष्ठ व अनुभवी उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यास आपण माघार घेऊ शकतो. मात्र सर्कलच्या बाहेरील आयात केलेला उमेदवार दिल्यास उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.