पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात अंबुलकरांनी उघडला ‘तिसरा डोळा’; २०२५ मध्ये गुन्हेगारीवर बुलढाणा पोलिसांचा जबरदस्त आघात; २६.४९ कोटींचा मुद्देमाल जप्त...
स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांनी वर्ष २०२५ मध्ये विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई करत एकूण २६ कोटी ४९ लाख ०७ हजार २९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कालावधीत खूनाचे चार, दरोड्याचे तीन, तसेच दरोड्याच्या तयारीतील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. याशिवाय जबरी चोरीचे १७, घरफोडीचे २३, गौण खनिज (रेती) चोरीचे २०, मोटारसायकल चोरीचे १६, जनावर चोरीचे १९, तार चोरीचे ४, बॅग लिफ्टींगचे ८ तसेच इतर चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.तसेच अंमली पदार्थांचे १५, ई.सी. अॅक्टचे ९, आर्म अॅक्टचे ६, जुगाराचे २०४, दारूबंदीचे २८९, फरारी आरोपी अटक — ४१, फसवणूक व इतर गुन्हे — १३, गुटखा — १०, मपोकायदा — ४, तडीपार कारवाई — १६९, एम.पी.डी.ए. — २० व मकोका — १ अशा विविध प्रकरणांमध्येही विशेष कामगिरी करण्यात आली आहे.
ही दमदार कामगिरी
जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात पो.नि.सुनिल पंजाबराव अंबुलकर, स.पो.नि.यशोदा बळीराम कणसे, पो.उप.नि.प्रताप विजय बाजड, पो.उप.नि.पकंज जगन्नाथ सपकाळे,पो.उप.नि.अविनाश अंबादास जायभाये, सफौ ओमप्रकाश मुक्ताराम सावळे यांच्यासह सहकाऱ्यांनी केली.
निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाची सर्वांगीण कामगिरी
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने वर्ष २०२५ मध्ये एकूण ५९ कोटी ७३ लाख १७ हजार २८८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हाभरातील कामगिरीत खून — ५५, दरोडा — ७, जबरी चोरी — ४९, दरोडा तयारी — ४, घरफोडी — ६२, इतर चोरी — ३८७, गौण खनिज (रेती) चोरी — १३३, आर्म अॅक्ट — ४४, एन.डी.पी.एस. अॅक्ट — १०३, जुगार — १,९६६, दारूबंदी — ४,९८६, गुटखा — २४, ई.सी. अॅक्ट — २६, मोटार वाहन कायदा अंतर्गत — १,१३,०६९ कारवाया, सायबर गुन्हे — २७, तांत्रिक विभाग — ५३३ व आगुशा — ८ अशा गुन्ह्यांची उकल करून व्यापक कारवाया करण्यात आल्या आहेत.या सर्व व्यापक कारवाईमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे.
गुन्हेगारांमध्ये धास्ती, नागरिकांमध्ये विश्वास
स्थानिक गुन्हे शाखेने उघडलेला हा ‘तिसरा डोळा’ गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा ठरत असून, सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पुढील काळातही गुन्हेगारीविरोधात कठोर व परिणामकारक कारवाई सुरूच राहील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.