ग्राहकांचा विश्वास हेच संस्थेच्या यशाचे बळ - संदीपदादा शेळके; राजर्षी शाहू मल्टीस्टेट बिबी शाखेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात...
राजर्षी शाहू मल्टीस्टेट शाखेचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 11 जुलै रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर ठाणेदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार वाय. झेड. चव्हाण, ज्ञानेश्वर गाडे, दत्तात्रय भोके, गोविंद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले, पाच वर्षांचा हा प्रवास केवळ संस्थेचा नाही, तर प्रत्येक सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि समाजाच्या विश्वासाचा आहे. हा विश्वास, ही साथ आणि ही सेवा अशीच अखंड सुरू राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच समाजहितासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक, माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिकांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात संस्थेने अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे, ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीचे आणि समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमास स्थानिक संचालक, ग्राहक, सभासद, ग्रामस्थ यांच्यासह विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले, शाखा व्यवस्थापक रवींद्र घायाळ व कर्मचारी उपस्थित होते.