पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व बँक खाते लिंकिंग पूर्ण करावे - जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे
ही यादी जिल्ह्यातील संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, तलाठी कार्यालय, संबंधित बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील नोटीस बोर्डवर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी व आधार कार्ड घेऊन जवळच्या ई-सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अद्याप बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत, त्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून खाते आधारशी लिंक करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना तालुकास्तरीय अथवा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येणार आहे.
शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आधार प्रमाणीकरणासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेची दुसरी यादी तपासून तातडीने कार्यवाही करावी.