बंजारा समाज मेहनती, कष्टकरी आणि देशासाठी नेहमीच समर्पित ; आ.श्वेताताई महालेंचे प्रतिपादन!बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात सामाविष्ट  करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा!

आ.सौ.महालेंची राज्य सरकारकडे मागणी..
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बंजारा समाज हा मेहनती, कष्टकरी समाज आहे. या समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिली आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी न्याय मागणी असून सरकारने याचा सकारात्मक विचार करावा अशी अपेक्षा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आ. सौ.श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली आहे.
हैद्राबाद स्टेट गॅझेटियर (१९२०) नुसार लांबडा / बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आलेला असूनही, बंजारा (लमाण) समाजाला अद्यापही एस.टी. प्रवर्गाचा दर्जा मिळालेला नाहीया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात बंजारा समाज संघटनांनी नमूद केले आहे की, हैद्राबाद गॅझेटियरमध्ये लांबडा अथवा बंजारा (सुगळी) हा मोठ्या प्रमाणावर भटकंती करणारा समाज असून हैद्राबाद राज्यातील विविध भागांत विशेषतः विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेलगत तो मोठ्या संख्येने आढळतो. हा समाज स्वतंत्र जमातीचा असून त्यांचा वेगळ्या आदिवासी समाज म्हणून स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

मात्र, सन १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर या समाजाला ओबीसी/एनटी-सी प्रवर्गात टाकण्यात आले. दुसरीकडे, तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच हैद्राबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे.

या मागणीला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी नम्र शब्दांत सांगितले की, “बंजारा समाज मेहनती, कष्टकरी आणि देशासाठी नेहमीच समर्पित राहिलेला आहे. त्यांना ऐतिहासिक न्याय मिळणे आवश्यक असून शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.