एसपी निलेश तांबे मैदानात! सुरक्षा व्यवस्थेची चौका चौकात जाऊन तपासणी...
Dec 21, 2025, 11:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या ११ नगरपालिकांचे निकाल आज समोर येत आहेत. दरम्यान जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्वतः एसपी निलेश तांबे प्रत्येक गोष्टींचे अपडेट घेत आहेत. याशिवाय सकाळपासूनच बुलढाणा शहरातील चौका चौकात जाऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. निवडणूक निकालानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख निलेश तांबे यांच्याकडून पोलीस दलाला निर्देश देण्यात आले आहेत...
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.