चिखलीत ‘शिंदे हॉस्पिटल’च्या नव्या इमारतीचे उद्घाटन...
या कार्यक्रमासाठी विनीत म्हणून गयाबाई देवराव शिंदे, शोभा रामेश्वर नरवाडे, शीलाताई धोंडीराम पाटील, मिनाताई राजेंद्र शिंदे, डॉ. प्रतिभा दिपक भगत, डॉ. दिपक दत्तु भगत, रामेश्वर ज्ञानदेव नरवाडे, धोंडीराम मारूती पाटील व राजेंद्र देवराव शिंदे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अभिमन्यु तेजराव शिंदे (M.B.B.S., M.S. Obs-Gynac, Fertility Specialist, Gynac Endoscopic Surgeon) व डॉ. सविता अभिमन्यु शिंदे (M.B.B.S., D.N.B. Pediatrics, L.A.F. Neonatology) हे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करणार आहेत.
उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम बी.डी.सी.सी. बँकेच्या पाठीमागे, खामगाव चौफुलीजवळ, चिखली येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.