२४६ कोटी रूपयाच्या वसूलीसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर;वीज बिल भरण्याला प्रतिसाद न दिल्यास वीज पुरवठा खंडीत करणार, मुख्य अभियंता राजेश नाईक यांचा इशारा...
परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ५ लाख ३ हजार ५३७ घरगुती ग्राहकाकडे १९१ कोटी ७२ लाख थकीत आहे,तसेच वाणिज्यिक वर्गवारीतील ३२ हजार ८८६ ग्राहकाकडे २२ कोटी ३४ लाख रूपयाचे वीजबिल थकले असून सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारील ७ हजार ६६७ वीज ग्रारकांकडे १० कोटी रूपये वीजबिलाचे थकीत आहे. वीज ग्राहकांना अखंडित सेवा देण्यास महावितरण जबाबदार असून,वीजेचे बिल वेळेत भरण्याची जबाबदारी वीज ग्राहकांनी घ्यावी,तसेच महावितरणच्या प्रत्येक कर्मचारी यांनी आपल्या क्षेत्रातील थकबाकीदार वीज ग्राहकांना वेळेत आणि प्राधान्याने बिल भरण्याची सवय लावावी,अन्यथा प्रतिसाद न देणाऱ्या ग्रारकांचा वीज पुरवठा खंडित करून त्याची नोंद ऑनलाईन प्रणालीत करावी,तसेच संबंधित ग्राहकाची थकबाकी वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून वसूल करून थकबाकी,पुनर्जोडणी शुल्क आणि सुरक्षा ठेव भरल्याशिवाय त्या वीज ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत न करण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले आहे.