संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुलढाण्यात दिमाखात उद्घाटन; २०५ महाविद्यालयांतील ६ हजार विद्यार्थी सहभागी; २८ कलाप्रकारांचे होणार सादरीकरण;
‘युवा संस्पर्श’ या कार्यक्रमांतर्गत महोत्सवात तब्बल २८ विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अमरावती विभागातील २०५ महाविद्यालयांमधील सुमारे ६ हजार विद्यार्थी या युवा महोत्सवात सहभागी होत असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासोबतच त्यांच्या सर्जनशीलतेला आणि सांस्कृतिक कौशल्यांना चालना मिळणार आहे.
या सोहळ्यासाठी युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. निखिलेश नलोडे यांच्यासह डॉ. सावन देशमुख, डॉ. नेत्रा मानकर, डॉ. प्रशांत बागडे, प्रा. सूरज हेरे, डॉ. सीमा देशमुख, डॉ. शर्मिला देशमुख यांनी परिश्रम घेतले. तसेच श्री. अरुणभाऊ चव्हाण, डॉ. शिरीष जैन, डॉ. हर्षद केला, डॉ. विजय बोरकर, प्रा. मोहसीन खान, प्रा. पवन जगताप, प्रा. सुजित पाटील, प्रा. नरवाडे, डॉ. राणे आणि डॉ. ठाकूर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तंत्रज्ञ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
द्वारका फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा
दरम्यान, यंदा बुलढाणा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना युवा महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा संदेशही देण्यात आला आहे. द्वारका फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हा निधी देण्यात येणार असल्याने युवा महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.