रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईतून संग्रामपूर तालुका वगळला; संतप्त शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...
खरीप २०२४ पिकविमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अजूनही पूर्ण लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात विमा रक्कम वितरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना प्रकाश भिसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शासनाने संग्रामपूर तालुक्याशी अन्याय केला असून, निर्णयात सुधारणा न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल.”असा इशारा शासनाने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या या हालचालीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघाले आहे. स्थानिक जनप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे.
निवेदन देताना सतीष वानखडे, रामकृष्ण वानखडे, प्रल्हाद सावतकर, दशरथ वानखडे, उमेश उकर्डे, सुनील शिरसोले, दत्ता पोहनकर, सुमित देऊळकार, तुषार तायडे, नारायण इंगळे, हामिद पाशा, अशपाक देशमुख, तौसिफ खान, इरफान शेख, हिम्मत भटकर, काशिनाथ तायडे, रवी गावंडे, प्रशांत गिरी, सुनील राजनकर, श्रीराम राऊत, तुषार सातव, हरीश भट्टकर, अक्षय शिरसोले, शरद पाटील, आशिष भासकडे, भागवतराव मारोडे, विशाल चोपडे, विनोद राजनकर, रोशन बोदडे, नागेश पाटील, गजानन तायडे आदी शेतकरी उपस्थित होते.
संजय कुटे यांच्या मतदार संघावर अन्याय
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीमध्ये सुरूवातीपासूनच संग्रामपूर तालुक्यावर अन्याय सुरू आहे. आधी हा तालुका दुष्काळग्रस्ताच्या यादीतून वगळण्यात आला हाेता. त्यानंतर आता रब्बीच्या मदतीतूनही संग्रामपूर तालुका वगळण्यात आला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार डाॅ. संजय कुटे यांच्या मतदार संघात हा तालुका येताे. तरीही या तालुक्याला रब्बी हंगामातील मदतीतून वगळण्यात आले आहे.