चतुर्थ श्रेणी मान्यता मागणीसाठी महसूल सेवकांचे नागपुरात आमरण उपोषण; बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारीही सहभागी...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) यांच्या चतुर्थ श्रेणीतील समावेशाच्या मागणीसाठी अखेर जीवावर उदार होत नागपूर येथे संविधान चौकात महसूल सेवकांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा महसूल सेवक संघटनेचाही सक्रिय सहभाग असून, विदर्भ पटवारी संघटनेने या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अनुप म्हस्के, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील अध्यक्ष उपाेषणाला बसले आहेत. बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) यांच्या चतुर्थ श्रेणीतील समावेशाच्या मागणीसाठी अखेर जीवावर उदार होत नागपूर येथे संविधान चौकात महसूल सेवकांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा महसूल सेवक संघटनेचाही सक्रिय सहभाग असून, विदर्भ पटवारी संघटनेने या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अनुप म्हस्के, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील अध्यक्ष उपाेषणाला बसले आहेत. बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) यांच्या चतुर्थ श्रेणीतील समावेशाच्या मागणीसाठी अखेर जीवावर उदार होत नागपूर येथे संविधान चौकात महसूल सेवकांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा महसूल सेवक संघटनेचाही सक्रिय सहभाग असून, विदर्भ पटवारी संघटनेने या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अनुप म्हस्के, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील अध्यक्ष उपाेषणाला बसले आहेत. बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) यांच्या चतुर्थ श्रेणीतील समावेशाच्या मागणीसाठी अखेर जीवावर उदार होत नागपूर येथे संविधान चौकात महसूल सेवकांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्हा महसूल सेवक संघटनेचाही सक्रिय सहभाग असून, विदर्भ पटवारी संघटनेने या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष अनुप म्हस्के, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील अध्यक्ष उपाेषणाला बसले आहेत. 
या उपोषणामुळे शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, उपोषणकर्त्यांची मागणी आहे की — “चतुर्थ श्रेणीची मान्यता देऊन महसूल सेवकांना सन्मानाने जगण्याची संधी द्यावी.” जिल्हाध्यक्ष पंडितकुमार इंगळे यांनी सांगितले की, “महसूल विभागाचा कणा असलेला महसूल सेवक २४ तास शासकीय जबाबदाऱ्या पार पाडतो, तरीही त्याला केवळ १५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर उदरनिर्वाह करावा लागतो. आजच्या महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि घरखर्च भागवणे अशक्य झाले आहे.”

महसूल सेवकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून ते शेतसारा वसुली, पंचनामे, पिकांचे नुकसान, अतिवृष्टी व दुष्काळ अहवाल, निवडणुकीची कामे, नोटीस बजावणी, ई-पिक पाहणी, तसेच शेतकरी, शेतमजूर, अनाथ, विधवा आणि अपंग लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे या अनेक कामांमध्ये सातत्याने योगदान देतात.
बुलढाणा जिल्हा सचिव विष्णू सानप यांनी सांगितले की, “मागणी मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरुच राहील.”
नागपूर येथील उपोषणात जिल्हा कार्याध्यक्ष अनुप म्हस्के, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील अध्यक्ष आणि महसूल सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.