महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी जिल्ह्यात; विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी; चिखलीच्या पतसंस्थेचे करणार उद्घाटन!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे आज ९ ऑगस्ट २०२५ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. दिवसभर जिल्हाभरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. 

जाहिरात....👆

सकाळी १०.१५ वाजता जाफराबाद येथून मोटारीने चिखली कडे ना. बावनकुळे हे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११ वाजता चिखली येथे आगमन व देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिखली जि. बुलढाणा या संस्थेच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता चिखलीहून बुलढाणाकडे प्रयाण करतील. 


दुपारी १२.३० वाजता बुलढाणा येथे आगमन व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे निवासस्थानी भेट. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांचे निवेदने स्विकारणे करीता राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी १.४५ वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भूमी अभिलेख विभागाचा आढावा. सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद. त्यानंतर सायंकाळी 4.35 वाजता संभाजीनगर बुलढाणा ये‍थे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.50 वाजता गर्दे हॉल येथे आगमन व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत संवाद. सायंकाळी 5.50 वाजता जळगाव जामोदकडे प्रयाण. रात्री 7.20 वाजता आमदार संजय कुटे यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. रात्री 8 वाजता मोटारीने जळगाव जामोद येथून शेगांव बुलढाणाकडे प्रयाण. रात्री 8.45 वाजता शेगाव येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. त्यानंतर शेगांव येथे मुक्काम करणार आहेत. रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सोईनुसार शेगांव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.