चिखलीत सोमवारी येणार महसूल मंत्री बावनकुळे! देव्हडे कुटुंबाने ठेवलाय खास कार्यक्रम...देव्हडे फॉर्म ॲन्ड ॲग्रो टुरिझम चे करणार उद्घाटन..
Apr 17, 2026, 18:47 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी चिखलीत येणार आहेत. एका खास कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांची चिखलीत आगमन होणार आहे. चिखलीतील भाजप नेते रामदास देव्हडे व कुटुंबीयांनी सुरू केलेल्या एका खास उपक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. सोमवारपासून देव्हडे फार्म ॲन्ड ॲग्रो टुरिझम पर्यटकांच्या सेवेत सुरू होणार आहे..
ना. बावनकुळे यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सोमवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथून शेगाव हेलीपॅड येथे आगमन व संत गजानन महाराज संस्थानकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री संत गजानन महाराज संस्थान येथे दर्शनासाठी राखीव. सकाळी 11 वाजता शेगाव हेलीपॅड येथून चिखलीकडे रवाना.
सकाळी 11.30 वाजता चिखली येथील शेरखजी बोंदरे यांच्या शेतातील हेलीपॅडवर आगमन व कार्यक्रम स्थळी प्रस्थान. दुपारी 11.45 वाजता देव्हडे फार्म ॲन्ड ॲग्रो टुरिझमचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता चिखली हेलिपॅड येथे आगमन व नागपूरकडे प्रयाण करतील.