खडकपूर्णा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडा!  माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी!

 
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खडकपूर्णा धरणाचे पाणी खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री तथा आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज, अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. धरणाच्या खाली असलेल्या  खडकपूर्णा नदीपात्रात पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत, जनावरांना पिण्यासाठी नदीमध्ये पाणी असणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला खडक पूर्णा नदी ही संपूर्णपणे कोरडी झालेली आहे. पाणी सोडल्यामुळे जनावरांना पाणी व चाऱ्याची मदत होईल याकरिता माजी मंत्री व सिदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडकपूर्णा धरणाचे पाणी  सोडण्याची मागणी केली.

मागील दोन महिन्यांपासून  आपल्या मागणीकडे जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही डॉ. शिंगणे यावेळी सभागृहात बोलतांना केला.  जलसंपदा विभागाने ताबडतोब निर्णय घेऊन नदीपात्रात पाणी सोडावे अशी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.