दारु ढोसून शाळेत धिंगाणा घालणारा व कागदावर खिचडी वाटणारा मुख्याध्यापक निलंबीत; एकाच दिवशी दोन मुख्याध्यापकांवर कारवाई; शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !
मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक या गावात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत १०७ पटसंख्या आहे.
शिक्षक विद्याथ्यांना मूल्यशिक्षण देतात. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. परंतु अशा शिक्षकांमुळे विद्याच्यांची दिशा भरकटण्याची भीती आहे. यासंदर्भात पालकांनी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल न घेतल्याने तळीराम शिक्षकाने धिंगाणा घातला. मोहना बुद्रुक येथील शाळेवर सहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु सध्या तीन शिक्षकच कार्यरत आहेत. त्यातील धम्मसागर कांबळेकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आहे. आधीच शिक्षक कमी, त्यात दारूड्या शिक्षकाचा भर असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाने वेळीच दखल न घेतल्यास विद्याथ्यांचे भवितव्य अंधः कारमय होण्याची शक्यता आहे. यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चक्क कागदावरच वाटली खिचडी
संग्रामपूर या आदिवासीबहुल तालुक्यातील बावनबीर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतही चालणारा गलथान कारभार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे समोर आला. विद्याध्यर्थ्यांना चक्क वृत्तपत्राच्या कागदावर मध्यान्ह भोजनाची खिचडी खायला देण्यात आल्याचा प्रकार २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आला.
शाळेत मध्यान्ह भोजनावेळी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत खिचडीचे वाटप करण्यात आले, विद्यार्थीदिखील खिचडी खाण्यात गुंग झाले. पण, ही खिचडी देण्याची पद्धत वापरून मुख्याध्यापक नरहरी टिकार यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले विद्याथ्यर्थ्यांना चक्क वर्तमानपत्राच्या पानांवर ही खिचडी देण्यात आली. विद्यार्थी जेवण करीत असताना त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचाही वावर सर्रास सुरू होता. त्याकडे लक्ष द्यायला ना मुख्याध्यापकाकडे वेळ होता ना शिक्षकाकडे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनीदेखील रोप व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराय खरात यांनी संग्रामपूरच्या बीडीओ आदेश देताच नियमांची पायमल्ली करणाऱ्या मुख्याध्यापक नरहरी टिकार यांना निलंबित करण्यात आले.