पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांप्रति केंद्र सरकारची बांधिलकी! केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन....
“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आणि शेतीत नवनवीन प्रयोग करता यावेत यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. वेळेवर मिळणारी ही आर्थिक मदत बियाणे खरेदीसारख्या महत्वाच्या गरजांसाठी उपयुक्त ठरते. ही योजना ही अन्नदात्याच्या कष्टाचा सन्मान करणारी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी,” असे आवाहन जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसोबत बसून ऐकले पंतप्रधानांचे भाषण...
पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. या निमित्त वाराणसी येथील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दाखविण्यात आले. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या सोबत बसून एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. “आपण प्रथम शेतकरी आणि नंतर मंत्री,” हा संदेश त्यांच्या साध्या वर्तनातून शेतकऱ्यांना मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले.