‘PAHEL Institute’ ठरतेय पालकांचा पहिला विश्वास! बुलढाण्यातच करा NEET, JEE ची तयारी! हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा जिंकला विश्वास.. "ही" आहे खासियत...

 
बुलढाणा (वाणिज्य प्रतिनिधी/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोठ्या शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपल्या मुलांना स्थानिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी बुलढाण्यातील पालकांचा कल वाढताना दिसत आहे. अशा वेळी NEET, JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शन देणारे PAHEL Institute विद्यार्थ्यांसाठी प्रभावी पर्याय ठरत आहे.
गेल्या सहा वर्षांपासून PAHEL Institute ने ‘Concept + Practice + Proper Guidance’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम सातत्याने केले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनातून AIIMS व GMC सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवत विद्यार्थ्यांनी बुलढाण्याचा नावलौकिक वाढवला आहे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वैद्यकीय (Medical) आणि 40 हून अधिक BDS व BAMS प्रवेशांसह 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा विश्वास PAHEL ने जिंकला आहे.

या संस्थेची खासियत म्हणजे IITian Faculty (Avanti Learning, मुंबई) यांचे सहकार्य, डिजिटल स्मार्ट क्लासेस, दररोज MCQ सराव, ऑनलाईन चाचण्या व सविस्तर प्रगती विश्लेषण, शंका निरसन सत्रे आणि पालकांशी सातत्यपूर्ण संवाद. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक भक्कम आणि परिणामकारक होत आहे.

संस्थेचे संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव सांगतात, “योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि सकारात्मक वातावरण मिळाले, तर विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जाण्याची गरज उरत नाही. PAHEL मध्ये आम्ही सुरक्षिततेसोबत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देतो.”

NEET, JEE, MHT-CET सोबतच इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीसाठी फाउंडेशन बॅचेसही येथे उपलब्ध आहेत. नवीन बॅचेस १५ एप्रिलपासून सुरू झाल्या असून प्रवेश मर्यादित असल्याने पालकांनी लवकर निर्णय घेण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

शहरातच उत्कृष्ट मार्गदर्शन, सुरक्षित वातावरण आणि सिद्ध यशाचा ट्रॅक रेकॉर्ड—या तिन्ही बाबींचा संगम असलेले PAHEL Institute विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थाने ‘पहिली पायरी’ ठरत आहे. 

पत्ता : चैत्यन्य वाडी, बुलढाणा संपर्क : 9763009156 / 9766924900