डोळ्यासमोर पंढरी, आणि पांडुरंगाला नाचते पाहण्याचे भाग्य मिळाले- आमदार श्वेताताई महाले; चिखलीमध्ये "विठू माऊलीच्या दारी" कार्यक्रम उत्साहात व भर पावसात संपन्न..!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हिंदू माणसाला राम रमवतो, कृष्ण आकर्षित करतो आणि या दोघांचीही वैशिष्ट्ये असणारा पांडुरंग भक्तिरसातून जगाला मार्ग दाखवतो मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक खात्याचे सचिव विकास खर्गे साहेब यांनी आयोजित केलेल्या आमचे मोठे बंधू आदरणीय राजेश दादा सरकटे प्रस्तुत स्वर विहार च्या माध्यमातून माऊलीच्या दारी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. मनापासून आपण सगळेजण आलात आपले आभार सुद्धा मानते. अशा शब्दात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी आपले उद्घाटनीय विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व सांस्कृतिक संचालनालय मुंबई यांच्या विद्यमाने भक्तीरसाचा अमृतमय अनुभव अशा भक्तीसंगीताचा कार्यक्रम चिखली मध्ये परमहंस मौनीबाबा रामकृष्ण मठाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रा. राजेश सरकटे, सुप्रसिद्ध गायिका अमृता नातू, गायिका पायल सरकटे तसेच या संचाकडून करण्यात येणारे दिंडी नृत्य व समाविष्ट कथक नृत्याचा अविष्कार हे होते. या कार्यक्रमाच्या दिपप्रज्वलन प्रसंगी बोलताना आमदार सौ श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, " आपण इतके दिवस फक्त ऐकून होतो, परंतु यावर्षी या पांडुरंगाच्या वारीमध्ये जाण्याचे भाग्य त्यांना मिळालं आणि तिथे गेल्यानंतर खरी वारी काय असते ते कळालं अशा शब्दात आ. सौ. श्वेता महाले यांनी वारीची महती सांगितली. सगळं काही विसरून श्रीमंत,गरीब जाती-पाती, लिंग सगळा भेदभाव विसरून त्या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला असतो आणि कुठेतरी या जगाचा सुख किंवा मोक्ष कुठे असेल तर ते पांडुरंगाच्या चरणी आहे ही भावना त्याला त्या ठिकाणी वारीमध्ये गेल्यानंतर येते.असे वारीची अनुभूती आ. सौ. श्वेता महाले यांनी व्यक्त केली.

 ज्ञानेश्वर माऊलीची ही 725 वी जयंती आहे आणि सोबतच श्री संत तुकाराम महाराजांची ही 425 वी जयंती आहे आणि अशा या शुभमुहूर्तावरती देवा भाऊंनी आयोजित केलेला हा वारकऱ्यांसाठीचा हा कार्यक्रम आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येकाची इच्छा असते की आपण सुद्धा पांडुरंगाची सेवा करावी, आपण सुद्धा वारीमध्ये जावं, पांडुरंगाचे दर्शन घ्यावं परंतु संसारिक माणसाला ते शक्य होत नाही परंतु आज राजेश सरकटे यांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता आलं की पंढरीची वारी कशी असते आणि त्या वारीचा अनुभव, साक्षात्कार आपण वारीमध्ये आहोत की काय? त्याचा साक्षात्कार आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. असे गायक कलावंत यांच्या स्तुतीपर आ. सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या.

 गायक राजेश सरकटे, गायिका अमृता नातू त्याचप्रमाणे राजेश सरकटे यांची कन्या गायिका पायल सरकटे यांनी गायनातून अक्षरक्ष पंढरी डोळ्यासमोर उभी केली आणि पांडुरंगाला नाचते केले. अशा शब्दात गायक व संचांचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी कौतुक केले. कलावंतांना असं पाठबळ हव असत, कापसाची भूमी म्हणून विदर्भ ओळखला जात होता या कापसाच्या वाती आणि सरकीतलं तेल आणि त्या सगळ्यांचे परंपरा जपणारी सगळी मंडळी येथे आहोत आणि म्हणून आपण सगळे दुष्काळी शेतीच्या बापाचे वंश आहोत, दिस जातील दिस येतील या भावनेने आपण आयुष्य जगत असतो पण मला असं वाटतं की या ठिकाणी आमदार महोदय जेव्हा स्वतः वारीमध्ये जातात त्यामध्ये एसटी बस मध्ये बसून नागपूरच्या अधिवेशनाला जाणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव काका आणि वारीमध्ये सामील होणाऱ्या चिखलीच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे वेगळं पण आपण निश्चितच लक्षात घेण्यासारखे आहे, वाखाण्यासारखे आहे.असे गायक राजेश सरकटे यांनी मनोगत व्यक्त केले.

  बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात की "माहेर म्हणता म्हणता ओठ ओठाला ग मिळे, सासर म्हणता म्हणता वार तोंडामध्ये खेळे!!  म्हणून विठू माऊलीच्या पंढरीला जाणं म्हणजे माहेरी जाण्यासारखा आहे, चंद्रभागा ही साक्षात माझी बहीण आहे हे गृहीत धरून जेव्हा आपण वारीत सामील होतो तेव्हा निश्चितच जीवनाचे आध्यात्मिक सूत्र आपल्याला सापडायला लागते अशा शब्दात प्रा. विनोद सरकटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विठ्ठल, विठ्ठलाची भक्ती, पंढरपूर आणि एकूणच भक्ती संप्रदायाचा भक्तीरस श्रवन करून श्रोत्यांचे कर्ण तृप्त झाले. याप्रसंगी आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्यासह प्रा. सदानंद देशमुख, कर्नल जतकर,अंकुशराव पाटील, सुहास शेटे, पंडित दादा देशमुख, सागर पुरोहित, संजय गाडेकर,सुधीर चेके,राजेंद्र काळे, सुरेंद्र पांडे, संजय अमृतवार, ठाणेदार संग्राम पाटील, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, गटविकास अधिकारी समाधान वाघ,श्री गजानन पोफळे, अशोक अग्रवाल, शरद भाला, विजय वाळेकर इत्यादी जण उपस्थित होते