लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे जिल्हाभरात होणार दर्शन; ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील विविध शहरांत होणार आगमण; ५ फेब्रुवारीला खडकपूर्णा प्रकल्पात विसर्जन...
या पवित्र कार्यक्रमांतर्गत अस्थिकलशाचे दर्शन सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान परिसरातून सुरू होणार असून, त्यानंतर लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली व देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार, सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मस्थान समोर, लोणार येथे विनायक कापड केंद्र चौक,
मेहकर येथे अशोक हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, खामगाव येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ, शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक (मुक्काम – शेगाव), वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे कॉटन मार्केट,
जळगाव जामोद येथे दुर्गा चौक,नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मलकापूर येथे हनुमान चौक,
मोताळा येथे मोताळा फाटा (मुक्काम – बुलढाणा), बुलढाणा येथे गांधी भवन,चिखली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, आणि देऊळगाव राजा येथे बस स्टँड चौकात पवित्र अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
यानंतर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता संत चोखामेळा सागर (खडकपूर्णा) प्रकल्प येथे पवित्र अस्थिकलशाचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.