नेत्यांनो सोशल मीडिया वापरतांना अक्कल गहाण ठेवू नका! महापुरुषांच्या जयंती –पुण्यतिथीचे पोस्टर लावतांना जरा भान ठेवा;

नेत्यांना खुश करण्यासाठी महापुरुषांच्या फोटोच्या फोटोच्या वर   "गॉडफादर" नेत्यांचे फोटो....! हा महापुरुषांचा अपमानच..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..अक्कल गहाण ठेवलीय काही पुढाऱ्यांनी ! हल्लीच्या राजकारणात सोशल मीडिया ला महत्व प्राप्त झाले आहे..२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर केला आणि लोकसभेची निवडणूक जिंकली..त्यानंतर सर्वच पक्षांनी आपली सोशल मीडिया टीम कशी अद्ययावत राहील याची काळजी घेतली..अनेक नेत्यांनी स्वतःचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी "पगारदार" माणसेही ठेवली.. नेत्यांकडून करण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम, राजकीय सभा, वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या यासह महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला अभिवादन अशा अनेक बाबी सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केल्या जातात..फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स, व्हाट्सअप आदी माध्यमांवर नेतेमंडळी नेहमी सक्रिय असतात..आपलं काय सुरू आहे यापेक्षा विरोधी पक्षाचा नेता काय करतोय? यासाठी त्याच्या सोशल मीडिया खात्यावरील लक्ष ठेवले जाते.. असो..मुद्दा आहे तो काही नेते सोशल मीडिया हाताळताना अक्कल गहाण ठेवतात त्याचा..! पक्षाचा कार्यक्रम, निवडणुका आदी कार्यक्रमांत बॅनर बनवताना त्यावर वरिष्ठ नेत्यांचे फोटो घेणे  फोटो अपेक्षित असते..मात्र नेत्यांचे फोटो कुठे घ्यावेत अन् कुठे घेऊ नये हेदेखील स्वतःला पुढारी म्हणवून घेणाऱ्या काही नेत्यांना कळत नाही.. आज १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊंची आणि स्वामी विवेकानंदाची जयंती...सोशल मीडियावरून अनेक नेते त्यांना अभिवादन करत आहे,केलेच पाहिजे..मात्र हे करतांना आपल्या नेत्याचे (गॉडफादर) चे फोटो महापुरुषांच्या फोटोंच्या वर लावणे हे न पटणारे आहे.
बुलडाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास अगदी माजी आमदार राहून गेलेल्या माणसांकडून अशा अक्षम्य चुका व्हाव्यात?  अर्थात अशा चुका करणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे..आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी कुठेही त्यांचा फोटो वापरलाच पाहिजे, नाहीतर नेते नाराज होतील अशी भीती काही पुढाऱ्यांना असते..या भीतीपोटीच मासाहेब जिजाऊंच्या फोटोच्या वर, स्वामी विवेकानंदांच्या फोटोच्या वर गॉडफादर नेत्याचा फोटो लावताना पुढाऱ्याला जराही लाज वाटत नाही. महापुरुषांपेक्षा कुणीही राजकीय नेता मोठा नसतो आणि नाही हे या पुढाऱ्यांना कसे कळत नसेल..अशा पद्धतीने पोस्ट करणे हा महापुरुषांचा एक प्रकारे अपमानच ठरेल. याउलट काही नेते मात्र अगदी योग्य पद्धतीने सोशल मीडिया खाते हाताळतात, यामुळे त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड वाढत आहे..उदाहरणादाखल चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे फेसबुक इंस्टाग्राम वर लाखांच्या संख्येत फॉलोवर आहेत.. सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या बाबतीत त्या जिल्ह्यात अव्वल आहेत..कोणती पोस्ट कशी असावी, कुठे कुठल्या शब्दांचा वापर करावा याबाबतीत त्यांचे सोशल मीडिया खात्यावर पूर्ण लक्ष असते..आमदार संजय गायकवाड यांचे सोशल मीडिया खाते देखील दर्जेदार पद्धतीने हाताळले जाते...