भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी केशव परिहार!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय जनता पक्षाची युवा शाखा असलेल्या युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी केशव परिहार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केशव परिहार चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील असून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे..

उत्कृष्ट संघटक असलेले केशव परिहार भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. याआधी साखरखेर्डा मंडळ भाजपचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. आता नव्याने त्यांच्याकडे युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव म्हणून जबाबदारी आली आहे..