काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना मत म्हणजे विकासाला मत...महाविकास आघाडीच्या विकासमुखी राजकारणावर नागरिकांचा निर्विवाद विश्वास;  प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे प्रतिपादन...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील नागरिकांनी अलीकडच्या सभांमध्ये, कॉर्नर मीटिंगमध्ये आणि प्रभागनिहाय संवादांत ज्या उत्साहाने सहभाग नोंदवला, तो पाहता लोकांना कोणत्या प्रकारचे नेतृत्व हवे आहे हे स्पष्ट होते. आज जनता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही.उलट, जमिनीवर उतरणारे निर्णय, प्रत्यक्षात दिसणारे बदल आणि पारदर्शक कामकाज यावरच त्यांचा कौल आधारित आहे.  काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना मत म्हणजे विकासाला मत, असे आवाहन उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडकर यांनी केले
महाविकास आघाडीने गेल्या काही वर्षांत विकासाला केंद्रस्थानी ठेवत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अशा जनजीवनाशी निगडित क्षेत्रांतील कामांना नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवले. त्यामुळेच आज त्यांच्या मनामनात आघाडीबद्दल विश्वास, आदर आणि अपेक्षांची भावना अधिक बळकट झाली आहे.

सभांमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये एक ठाम संदेश दिसतो,
जनतेला आता संघर्ष, गोंधळ किंवा आरोप-प्रतिआरोपांचे राजकारण नको आहे. त्यांना हवा आहे विकासाचा मार्ग आणि स्थिर नेतृत्व. आणि काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या रूपाने तो दिसत असल्याचे प्रा. नरेंद्र खेडकर यांनी सांगितले


जनतेचा पाठिंबा महाविकास आघाडीलाचं

महाविकास आघाडीची ही विकासाभिमुख दृष्टी, जबाबदारीची भावना आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत यामुळेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांचा हा उत्स्फूर्त पाठिंबा हेच दाखवतो की चिखलीतील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच आहे, असेही प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले