हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा समाज हिताचा विचार पुढे नेणार - जालिंदर बुधवत; उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...!
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. उद्धव ठाकरे साहेबांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्राम दैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप आणि बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. २५ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतील ५ हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. २६ जुलैला सकाळी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप,मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर बुलढाणा येथील गर्दे वाचनाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा देखील पार पडला. यावेळी प्रवक्ता जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.चंदाताई बढे ,सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, डी. एस. लहाने सर, जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, युवांसेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, ॲड सुमित सरदार, उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, तालुका प्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, दीपक चांभारे पाटील, अशोकमामा गव्हाणे, गजानन उबरहंडे, मोहित राजपूत, शुभम घोंगटे, सिद्धेश्वर आंधळे, अनिल नरोटे, सुधाकर आघाव, रणजीत राजपूत, सरपंच संजय शिंदे, एकनाथ कोरडे, बबन खरे,शेख रफीक, यांचेसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती श्री. शिवाजी महाराजा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नैराश्यामुळे आणि पीक कर्जामुळे भरोसा तालुका चिखली येथील शेतकरी थुट्टे दांपत्याने आत्महत्या केली, त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले, शिवसेनेमुळे सामान्य माणसाला सत्ता पदे मिळाली. ज्यांना कोणीही ओळखत नव्हते त्यांना मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचं काम वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यांच्यानंतर उद्धव साहेबांनी शिवसेनेचा वसा आणि विचार जपत शिवसैनिकांना सत्ता पदे देण्याच काम केलं. अलीकडच्या काळात मिंध्ये गटाने केलेल्या गद्दारीमुळे उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. कुटुंबप्रमुखाची भूमिका निभवत उद्धव साहेबांनी त्या काळात कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सांभाळला. संकट संधी घेऊन येते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आगामी काळात काम करावे लागणार असे सांगितले.
यावेळी शिवसेनाप्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी आपल्या भाषणामध्ये महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
येता काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिवसैनिकांना सत्ता पदे मिळाली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकला पाहिजे , यासाठी झोकून देऊन सर्वांना काम करावे लागणार आहे. उद्धव साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट छाप सोडली. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केलं. पर्यावरण पूरक निर्णय घेतले. आता केवळ आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. केवळ उद्धवसाहेबांवर टीका करणे हाच एकमेव उद्योग त्यांचा उरला आहे. सत्याला कसोटी असते मात्र शेवटी विजय सत्याचाच होतो. महायुती सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. मायबाप शेतकरी अडचणीत असताना राज्याचे कृषिमंत्री यांना रमी खेळण्यापासून वेळ मिळत नाही. विधान मंडळात ते रमी खेळतात. सरकारच्या आठ महिन्याच्या कार्यकाळात आठ मंत्र्याना घरी जाण्याची वेळ आली आहे. मतदारांचा अपमान करणारी आणि केवळ आणि केवळ बेताल वक्तव्य हीच या सामान्य माणसांच्या पदरी पडत आहेत. याउलट उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात शिवसेना समाज हिताचा आपला वसा जपत आहे. सामाजिक भान आणि जाणीव असलेले उद्धवसाहेब नेते असल्याने त्यांचा विचार घेऊन तळागाळापर्यंत शिवसेना काम करत असे देखील त्या म्हणाल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्यात हाच समाज हिताचा विचार आपल्या कार्यकर्तृत्वतून अमलात आणावा असे आवाहन केले.
जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. डी.एस.लहाने म्हणाले की, शिवसेना ही समाजकारणाचा वसा घेऊन काम करत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असो गुणवंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असो तसेच रक्तदान व अन्य कार्यक्रम यातून उद्धव साहेबांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमातून ऊर्जा घेऊन , नव प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात आयएएस किंवा आयपीएस आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरवून जिल्ह्याच आणि राज्याचं नाव उंचवाव असं यावेळी लहाने म्हणाले.
जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपलं नाव कमवा. शेतकऱ्यांच आणि कष्टकऱ्यांचे दुःख समजून घ्या आणि भविष्यात जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा हे दुःख दूर करण्याची प्रेरणा घेऊन काम करा असा आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. तसेच "निष्ठावान शिवसैनिक" अशा स्वरूपातील सत्कार मेळावा किंवा घरोघरी जाऊन निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार कार्यक्रम भविष्यकाळात हाती घेऊ असे देखील यावेळी म्हणाले. सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. तर आभार लखन गाडेकर यांनी मानले.यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.