"हवा" म्हणतात ती याला! विद्याधर महालेंच्या स्वागतासाठी बुलढाण्यात उसळला अफाट जनसागर; डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा, शेकडो JCB मधून फुलांची उधळण! फुलांनी न्हाऊन निघाले विद्याधर महाले...
‘हवा म्हणतात ती याला!’ अशीच काहीशी चर्चा आज बुलढाण्याच्या रस्त्यांवर रंगली होती. विद्याधर महाले यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने काढलेल्या जंगी मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाड नाक्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि शुभेच्छांचा वर्षाव अशा उत्साहपूर्ण वातावरणात महाले यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, शेकडो JCBच्या माध्यमातून विद्याधर महाले यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. फुलांनी न्हाऊन निघालेले महाले आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यतत्परतेची पावती; जनसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
उच्चपदावर कार्यरत असतानाही सामान्य माणसांच्या अडचणी आणि प्रश्नांची जाण ठेवणारा अधिकारी म्हणून विद्याधर महाले यांच्याकडे पाहिले जाते. कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेमुळे अनेक सर्वसामान्यांना त्यांच्या कामांना गती मिळाल्याचा अनुभव आल्याचे बोलले जाते. त्याचाच प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमधील सर्वसामान्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून येत असल्याचे चित्र आहे.
आज बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिर येथे विद्याधर महाले यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यापूर्वी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने मात्र बुलढाण्याचे लक्ष वेधून घेतले.रस्त्यावर गर्दी, फटाक्यांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि शुभेच्छांचा वर्षाव... अशा वातावरणात विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाचा जल्लोष बुलढाण्यात अनुभवायला मिळाला. स्वागत सोहळ्याची भव्यता पाहता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आज अक्षरशः उत्साहाचा महापूर आल्याचे चित्र दिसून आले.