बुलढाण्यात प्रभाग क्रमांक ३ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शेख नदीम यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद! विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; नदीम शेख म्हणाले, विकासाचे व्हिजन घेऊन लढतोय.....
Dec 1, 2025, 13:26 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना विरुद्ध भाजपा असा तिरंगी सामना नगराध्यक्ष पदासाठी होतोय. मात्र असे असले तरी बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोर पकडला आहे. सामाजिक कार्याचा ठसा उमटवलेल्या शेख नदीम शेख सलीम यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली असून त्यांना मतदारांचा भरघोस असा पाठिंबा मिळतो आहे. नदीम भाऊ आमच्या घरातला माणूस आहे, आमच्या कुटुंबातला माणूस आहे, आमच्या सुखा दुखात धावून येणारा माणूस आहे त्यामुळे आम्ही त्यांनाच विजयी करणार अशा भावना प्रभागातील मतदार व्यक्त करत आहेत..
नदीम शेख हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. प्रभागातील समस्यांची त्यांना जाण आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून देखील त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले.. अशा सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याने मतदारांनी या निर्णयाचे स्वागत केलेले दिसत आहे.
नदीम शेख म्हणतात, विकासाचे व्हिजन घेऊन लढतोय..
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आतापर्यंत विकासाची व्याख्या म्हणजे परिवाराचा आणि कुटुंबाचा विकास अशीच होती.. विकास हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रभागातील सामान्य माणसांची कामे झाली पाहिजे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, शिक्षण, वीज अशा मूलभूत प्रश्नांवर आजही काम करण्याची आवश्यकता आहे. प्रभागातील जनतेने संधी दिल्यास "२४ तास नगरसेवक ऑन ड्युटी" असेल. नगरसेवकाला शोधण्याची गरज पडणार नाही.. नगरसेवक दारात हजर असेल.. आपण विकासाचे व्हिजन घेऊन लढत आहोत.. आपल्या विरोधात अफवा पसरवणाऱ्या लोकांचे धंदे मतदारांना माहित आहे, त्यामुळे मतदार त्यांना बळी पडणार नाहीत..मायबाप जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन नदीम शेख यांनी केले.