सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात ॲड. प्रवीण सुरडकर यांचा एकदिवसीय बैठा सत्याग्रह...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात त्यांच्या समर्थनार्थ एकदिवसीय बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी शहरातील जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिवसभराच्या सत्याग्रहाला सुरुवात केली आहे.

दिल्ली येथे गेल्या वीस दिवसापासून सुरू असलेले सोनम वांगचुक यांचे उपोषण आज दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा आरोप करत, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनात बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी एक दिवसीय बैठा सत्याग्रहाला सुरुवात केली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद आणि वीस तारखेचा होणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकारने ही दडपशाही केल्याचा आरोप करत, सरकारला त्यांच्या प्रकृतीची एवढी काळजी असेल तर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अशी मागणी देखील यावेळी सुरळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर सोनम वांगचुक यांच्या जीविताला धोका असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.