कुणी वाट्याला गेलं तर जशास तसे उत्तर देऊ! आ. श्वेताताईंच्या स्वीय सहाय्यकांची पोस्ट तुफान चर्चेत..म्हणाले, आम्ही पण तेल लावलेले पैलवान...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या काही दिवसांपासून चिखली विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा आहे. जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीत सध्या राजकारण तुफान पेटले आहे..काही दिवसांपासून आ.श्वेताताई महाले पक्षाच्या सूचनेनुसार केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या आहेत..मात्र त्यांच्या अनुउपस्थितीत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे महाले परिवारावर विविध आरोप करीत आहेत. आ. गायकवाडांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश सोहळे घेतले आहेत..या सगळ्या पार्श्वभूमीवर आ. श्वेताताई महाले पाटील यांचे स्वीय सहाय्यक सुरेश इंगळे पाटील यांच्या एका पोस्टची सोशल मीडियावर, गाव कट्ट्यावर तुफान चर्चा होत आहे. आपल्या पोस्टमध्ये सुरेश इंगळे यांनी आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याशिवाय आम्ही सुद्धा तेल लावलेले पैलवान असून यापुढे आमच्या वाट्याला कुणी गेला तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आला आहे..इथे सुरेश इंगळे पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी प्रकाशित करत आहोत..
आपल्या पोस्टमध्ये सुरेश इंगळे पाटील लिहितात,गेल्या_काही_दिवसापासून_चिखली_मतदारसंघ_चर्चेत आहे . अगदी शेजारचा पण येऊन आपला हक्क चिखली वर दाखवतो. अस प्रत्येकजण येऊन म्हणतो चिखली आपली आहे बर...अरे बाबा.. ही चिखली आहे.कळायला अन समजायला खूप वेळ लागेल. काँग्रेसला तर आता दुसरे कामच राहील नाही.सकाळी उठले की श्वेताताई आणि  महाले साहेब दिसतात. झोपले तरी त्यांची हिच परिस्थिती आहे. हे दोघेजण(महाले दांपत्य) तुमच्यासारखे गाव गुंडाच राजकारण करत नाही.. मला आठवत २०१३ -१४ चा तो काळ.. ताई राजकारणात नवख्या होत्या. ताईचे वडील व साहेबांचे वडील राजकारण व समाजकारणात सक्रिय होते..जेव्हा गाडी घरून निघायची तेव्हा समोरच्या सीट वर ताई असायच्या, मधल्या सीट वर एका साईटला त्यांचे वडील तर दुसऱ्या साइडला महाले साहेब यांचे वडील, मधात मात्र मी असायचो.. ताई नवीन, मी नवीन मात्र ह्या दोघांच्या गप्पा मात्र राजकारणाच्या असायच्या.. आपले जे झाले ते झाले.ताई आणि विद्याधर यांनी आपल्या ह्या गोरगरीब, दिन दलित , शोषित पीडित ,कष्टकरी समाजाची सेवा करावी. ह्या त्यांच्या गप्पा सारख्या असायच्या..बाकी नेते मंडळींनी काय केलं ते सर्व विसरून आपल्या ह्या मुलांनी मात्र समाज एकत्र आणावा आणि आपल्या मायभूमीचा विकास करावा . एखाद्या गावात जर गेलो तर महाले बाबा म्हणायचे मी दयासागर महाले, माझा मुलगा मंत्रयात खाजगी सचिव म्हणून आहे विद्याधर महाले. ही माझी सुनबाई श्वेताताई, तर दुसरा आवाज यायचा अंकुशराव पाटील यांचा.. मी मोठ्या मेऱ्याचा अंकुशराव पाटील.. ही माझी मुलगी आहे आमदारकीसाठी  विधानसभेची तयारी करत आहे भाजप कडून.. आशीर्वाद राहू द्या.. परत दुसऱ्या गावात गेली की गाडीत गंमत जमत व्हायची.. दयासागर बाबा म्हणायचे अंकुशराव मी समाजाची सेवा खूप केली. पण आता इच्छा आहे सूनबाईला आमदार कराव ..तर दुसरा आवाज यायचा अंकुशराव पाटील यांचा..माझी इच्छा आहे माझ्या मुलीने पण आमदार झाल पाहिजे. सर्व परिवाराने खूप मेहनत घेतली पण २०१४ चे आमदारकीचे तिकीट कटले.. तरी न थांबता तयारी सुरू ठेवली. पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. भाऊसाहेब फुंडकर यांनी महाले साहेब यांना बोलून सागितले श्वेताताई ला आपल्या ला जिल्हा परिषद ला उभे करायचे आहे.. ताई निवडणुकीत जिंकून पण आल्या .तेव्हा पासून काँग्रेस चे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या पायाखालची वाळू हळू_हळू सरकू लागली. 

  पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या ताईंना उमेदवारी मिळाली..पण समोर काँग्रेस चा बलाढ्य उमेदवार होता पैसा गडगंज, क्रूर राजकारणी, अनेकांना ज्यांनी भूमिहीन करणारा, गोर गरीब सामान्य माणसाच्या जमिनी बळकावणारा, शिक्षणमहर्षीच्या नावाखाली फक्त स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या. दूध डेअरी काढली ती पूर्ण लाटून टाकली. सूतगिरणीचे पण तेच हाल केले. साखर कारखान्याच्या नावाने कोट्यवधीचे कर्ज काढून शेतकऱ्यांना फसविले.शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असलेली जिल्हा बँक बुडविली.१० वर्षाच्या आमदकीच्या काळात फक्त स्वतःचा विकास केला.
२०१९ च्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन दगड फेक करणे . गावागावात समाजसमजात भांडण लावणे हेच काम ह्या माजी आमदाराने केले आहे.२०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला तरी हा पट्ट्या सुधारला नाही. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा हा बहाद्दर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. विद्याधर महाले साहेब यांची तक्रार करायला .याला फक्त स्वतःचा विकास पाहिजे.. ताई आमदार झाल्या, अडीच वर्षांनी पुन्हा महायुतीचे सरकार आले .महाले साहेब फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव झाले. दोघांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून आमदार ताईंना साथ देऊन कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. आणि नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.. विकास काय असतो हे ह्या जोडप्यांनी दाखवून दिले. आता तरी ह्या या माजी आमदाराने सुधरावे..काल त्यांनी भाड्याने महिला आणून विद्याधर महाले साहेब यांच्यावर  खोटे आरोप केले. "भाऊ", आम्हाला पण सर्व काही करता येते पण आम्ही तुमच्यासारखे क्रूर राजकारणी नाही आहोत. तुमचे सर्व कारनामे माहित आहे.योग्य वेळ आली तेव्हा सांगू तुम्हाला,  महाले दांपत्य काय आहे ते. "शेजारचा" तुम्हाला भेटायला आला म्हणून तुम्ही असे खोटे नौटंकी राजकारण करता का? आम्ही लोकांसारखे हप्ते घेत नाही. गुंडगिरी किंवा भाई गिरी करत नाही.आम्ही पण तेल लावलेलं पहिलवान आहे .फक्त आम्ही दाखवत नाही.. आमची ही संस्कृती नाही. आम्ही कोणाला धमकावत नाही..तुमच्या सारख्या जमिनी बळकावल्या नाही. उलट विकासच राजकारण केलं.. अन करत राहू. यापुढे जर कोणी आमच्या वाट्याला गेला तर त्याला तसाच तस उत्तर देऊ...