जमतंय वाटते! खामगाव –जालना रेल्वे मार्गाचे पाऊल पडते पुढे! केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना ना.जाधव भेटले ; लवकरच मिळणार अंतिम मंजुरी...
रेल्वे मार्गासाठी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन 2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली. त्यानंतर हा रेल्वे मार्ग पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आला आणि केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही 50% निधीची तरतूद करून यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या रेल्वेमार्ग सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. केंद्र सरकारचा 50% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे .या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन गोड बातमी जिल्हा वासियांना मिळणार आहे