चिखलीत शिवस्मारक पायाभरणीचा ऐतिहासिक सोहळा; आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन...
त्यांनी पुढे सांगितले, “हा ऐतिहासिक क्षण पुढील पिढ्यांना शिवरायांच्या धैर्य, शिस्त, पराक्रम व प्रजाप्रेमाची सतत आठवण करून देणारा आहे. स्वराज्याच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक आपल्याला नेहमी शिवरायांच्या शिकवणीशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देईल.”
भव्य स्वरुपात उभारणार अश्वारुढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा भव्य स्वरूपात उभारला जाणार आहे. जमिनीपासून १२ फूट उंचीवर खास चबुतऱ्यावर पुतळा बसवला जाणार आहे. पुतळ्याची एकूण उंची व लांबी तब्बल १५ फूट असेल.ब्राँझ धातूपासून निर्मित हा पुतळा भव्यतेबरोबरच सौंदर्यानेही शहराचे आकर्षण वाढणार आहे. शिवप्रेमाचे प्रतीक ठरणारे हे स्मारक चिखलीच्या सांस्कृतिक वैभवाला नवे रूप देईल.
ऐतिहासिक साेहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्यात शिवस्मारक समितीचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात अध्यक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, सचिव सतीश गुप्त, सहसचिव अनिस भाई, कोषाध्यक्ष डॉ. निलेश गावडे, सदस्य रमेश बाहेती, वसंतराव गाडेकर, सुनीता ताई शिनगारे, सुधीर चेके पाटील, सुरेंद्र पांडे, डॉ. श्रीकृष्ण खंडागळे, महेश महाजन, सचिन बोन्द्रे, पंडितदादा देशमुख, भगवान नागवानी, विलास चव्हाण आणि रामदास गाडेकर यांचा समावेश होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या दणदणाटात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यामुळे चिखलीकरांच्या शिवभक्तीला नवी ऊर्जा लाभली आहे.