शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर; ३० डिसेंबर राेजी जाहीर हाेणार अंतिम मतदार यादी; मतदार यादीत नाव टाकण्याचे आवाहन...
30 सप्टेंबर 2025 : सूचना प्रसिद्धी , १५ ऑक्टोबर : प्रथम पुनःप्रसिद्धी, २५ ऑक्टोबर : द्वितीय पुनःप्रसिद्धी, ६ नोव्हेंबर : दावे व हरकतीची अंतिम तारीख, २५ नोव्हेंबर : प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी, २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर : दावे व हरकती स्वीकार, २५ डिसेंबर : दावे व हरकती निकाली, ३० डिसेंबर २०२५ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नोंदणीची पात्रता
माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये मागील सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षे पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत.
अर्ज कुठे व कसा करायचा?
नमुना-19 व शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्रासह अर्ज तहसील कार्यालयात सादर करता येणार आहेत.अर्ज नमुना जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जदारांनी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर 2025 या कालावधीत अर्ज दाखल करावा. नमुना-19 मधील एकगठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मात्र, शैक्षणिक संस्थेचे प्रमुख आपल्या संस्थेतील पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील.
वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करावेत
“शिक्षक मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी निश्चित वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करून नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.