गोदरेजच्या GMH-6034 मका वाणातून मिळवले भरघोस उत्पादन; वाडी येथील प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा!
Nov 13, 2025, 17:37 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : “मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार बियाणे” या त्रिसूत्रीचा उत्तम नमुना म्हणजे गाव वाडी (ता. नांदुरा) येथील प्रगतशील शेतकरी य. दिनकर खाडे यांची यशोगाथा. गोदरेज कंपनीच्या GMH-6034 या मका वाणाची लागवड करून त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले असून शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
दिनकर खाडे यांनी फक्त अर्धा एकर क्षेत्रात २७ क्विंटल मका उत्पादन घेतले. म्हणजेच एकरी तब्बल ५४ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यांनी हा मका प्रति क्विंटल ₹२००० दराने विकून उत्तम नफा मिळवला. या भरघोस उत्पन्नामुळे खाडे यांनी आगामी हंगामासाठी पुन्हा GMH-6034 वाणाची लागवड करण्याचा निर्धार केला आहे.
या यशाबद्दल गोदरेज कंपनीचे बुलडाणा व जालना जिल्हा व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना उच्च उत्पादनासाठी पारंपरिक GMH-105 ऐवजी आता नवीन GMH-6034 वाणाची लागवड करावी. हे बियाणे अधिक उत्पादनक्षम व हवामान सहनशील आहे.”
हा मका वाण सध्या बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहिती आणि बियाण्यासाठी खालील प्रतिनिधीशी संपर्क करावा:
अजित क्षीरसागर–7028224658
ईश्वर पाबळे – 7499060032
आदित्य सदार – 8766808351
योगेश राठोड – 9356533086
मंगेश वाकडे – 7720910242
आकाश चव्हाण – 8830590112
“GMH-6034: अधिक उत्पादन, अधिक नफा, अधिक समाधान!”