गौरवास्पद..! राजर्षी शाहू मल्टिस्टेटला ग्रीन वर्ल्ड को- प्राईड पुरस्कार; सहकार मंथन राज्यस्तरीय कार्यक्रमात पुणे येथे झाला सन्मान ; संदीप शेळके म्हणाले, हा टप्पा......
Dec 22, 2025, 14:22 IST
बुलढाणा (बुलडाण लाइव्ह वृत्तसेवा):जागतिक सहकार वर्षाच्या औचित्यावर ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑप. बँक आयोजित सहकार मंथन राज्यस्तरीय कार्यक्रमात राजर्षी शाहू मल्टिस्टेटला 'ग्रीन वर्ल्ड को- प्राईड पुरस्कार' मिळाला. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी पुणे येथील कॉसमॉस को-ऑप.बँकेच्या सहकार सभागृहात २१ डिसेंबर रोजी हा सन्मान स्वीकारला.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार सेवा उपलब्ध करीत राजर्षी शाहू मल्टिस्टेटने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. बँकिंग सेवेसोबतच सामाजिक उपक्रम राबवण्यास संस्थेचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. संस्थेच्या यशस्वी कामगिरीमुळे अनेक पुरस्कार संस्थेला प्राप्त झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या ग्रीन वर्ल्ड को- प्राईड या पुरस्काराने संस्थेची मान उंचावली आहे. लेखक गौतम कोतवाल (अध्यक्ष, ग्रीन वर्ल्ड, लीड जीडब्ल्यू फाऊंडेशन, तज्ञ संचालक, राजगुरुनगर सह बँक लि.) व कॉसमॉस बँकेच्या संकल्पनेतून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशभरात हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, कॉसमॉस को- ऑप. बँक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सीए मिलिंद काळे यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. याप्रसंगी आस्थापना अधिकारी पवन सावळे, मुंबई विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, पिंपरी चिंचवड शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने उपस्थित होते.
अध्यक्ष संदीप शेळके म्हणाले..
ठेवीदार, ग्राहक, खातेदारांचा विश्वास आणि संस्थेच्या सहकारातील भरीव योगदानामुळे आतापर्यंत यशाचा प्रत्येक टप्पा गाठता आला. दर्जेदार सेवेसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत.