कोनड खुर्द येथे मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन! शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त "खास" उपक्रम..! आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन...
शिबिरात डॉ. विकास परमेश्वर पाटील (एम.बी.बी.एस., एम.डी. मेडिसिन) — पाटील हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, चिखली — यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, क्षयरोग, छातीतले आजार, अर्धांगवायू, किडनी व लिव्हरचे आजार, थायरॉईड, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, संसर्गजन्य आजार, संधिवात व अॅलर्जी आदींची तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.
तसेच शिबिरामध्ये खालील सुविधा उपलब्ध राहणार आहेत:
* ऑनलाइन AAY (पिवळे) रेशनकार्ड धारकांना मोफत शस्त्रक्रिया
* ऑनलाइन PHH (केशरी) रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
* मोफत जनरल तपासणी, चिकित्सा व मार्गदर्शन
* मोफत साखरेची तपासणी
* रक्तदाब तपासणी
शिबिरासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड व मोबाईल क्रमांक सोबत आणावेत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
याशिवाय शिबिरात नोंद असलेल्या रुग्णांना पाटील हॉस्पिटलमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून ही सवलत शिबिरानंतर १० दिवसांपर्यंत लागू राहणार आहे.
या उपक्रमासाठी दंततज्ज्ञ डॉ. राहुल सोनुने (बी.डी.एस.), रुख्मिणी दातांचा दवाखाना, जाफ्राबाद यांचेही सहकार्य लाभणार आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ७०२८५६३००१ किंवा ८८८८१ ६७१०५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठान, कोनड खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.