वाहनांच्या स्पेअर पार्ट दुकानाला लागली आग; लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक; खामगांव येथील घटना..!
Aug 1, 2025, 12:34 IST
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शाटसर्किट मुळे वाहनांच्या स्पेअर पार्ट दुकानाला आग लागल्याची घटना आज 1 ऑगस्ट ला सकाळी रेल्वे स्टेशन समोरील नगर परिषद कॉम्प्लेक्स मध्ये घडली. या मध्ये दुकानातील साहित्य जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
खामगाव शहरातील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या नगरपरिषद कॉम्प्लेक्स येथे रॉयल डेकोरेटर नावाने वाहनांचे स्पेअर पार्ट चे दुकान आहे, या दुकानाला आज सकाळी शॉट सर्किट मुळे आग लागली, काही वेळातच आगि ने रोद्ररूप धारण केले. दुकानांमध्ये असलेले लाखो रुपयाचे साहित्य व मशनरी जळून खाक झाले आहे. या मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळतात नगर परिषद चे अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आगिवर नियंत्रण मिळवले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.