Exclusive जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर लिंगाडेंनी काय दिवे लावले? ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्या आदिती पोहरेंचाही तोच अजेंडा; अवघ्या तीन आमदारांच्या बळावर शिक्षक मतदारसंघ जिंकणार कसा?

संघटनात्मक मरगळ आलेल्या काँग्रेसला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे की पराभवाची औपचारिकता पूर्ण करायची? पोहरेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच कुजबुज; “पराभवाची सुपारी घेतली का?” 
 
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...जिकडे तिकडे सगळीकडे तीच चर्चा आहे..विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. देशभरात क्रमांक दोनचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र या निवडणुकीत स्वतःला उमेदवार मिळाला नाही..ऐनवेळी अकोल्याच्या प्रकाश पोहरेंच्या सुनेला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली..निवडणूक लढण्याची कोणतीही पूर्वतयारी नाही..ठोस रणनीती नाही..शिक्षक मतदारांशी संपर्क नाही... ना प्रचारयंत्रणेचे कोणतेही नियोजन..आधीच अमरावती विभागातील एकूण ३० आमदारांपैकी केवळ ३ काँग्रेसचे, विधानपरिषदेचे लिंगाडेही काँग्रेसचेच... या ४ आमदारांच्या भरवश्यावर आदिती पोहरेंना शिक्षक आमदार खरंच होता येईल? की त्यांनी स्वतःच काँग्रेसच्या पराभवाची सुपारी घेतली आहे..? पोहरे कुटुंबाचा आतापर्यंतचा "इतिहास" पाहता कुणालाही अशी शंका येणे स्वाभाविक आहे..

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या धीरज लिंगाडेनी अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकली. प्रचारावेळी आव असा आणला की जसं काही ते आमदार होतील अन् जुनी पेन्शन योजना लागू होईल..ते सत्तेत नाहीत,हे समजून घेता येईल...पण ज्या पद्धतीने या मुद्द्यावर आक्रमक होऊन आवाज उठवायला पाहिजे होता तो आ. लिंगाडेंना जमला नाही.. बुलढाण्यावाल्यांना तर आपल्या शहरात काँग्रेसचाही आमदार आहे याचा विसर पडलाय इतकी राजकीय निष्क्रियता धीरज लिंगाडेंची आहे.. त्यामुळे एकदा काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊन फसल्यावर दुसऱ्यांदा शिक्षक मतदार तोच मुद्दा अजेंड्यावर ठेवणाऱ्या आदिती पोहरेंच्या शब्दाला भुलण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत असे एकंदरीत चित्र आहे. 

दुसरीकडे अमरावती विभागात काँग्रेसचे संघटन एवढे कमकुवत झाले आहे की आपल्या पक्षाला अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढायची आहे याची माहितीच अनेक काँग्रेसच्या जिल्हापातळीवरील वरिष्ठ  नेत्यांना नाही..एवढी संघटनात्मक वाताहत काँग्रेसची झाली आहे..
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अमरावती विभागात पाहिजे तसा प्रभाव नाही..महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आधीच बुलढाण्याच्या दत्तात्रय लहानेंची उमेदवारी घोषित केली आहे.त्यामुळे गलितगात्र झालेल्या  काँग्रेसच्या भरवश्यावरच आदिती पोहरेंना ही निवडणूक लढवावी लागणार आहे..अकोल्यातील काही भाजप नेत्यांच्या छुप्या पाठिंब्यावर आपलं जमून जाईल असे स्वप्न अधूनमधून पोहरेंना पडत असेलही मात्र तशी शक्यता कमीच आहे..एकंदरीत स्वतः पोहरेंनीच काँग्रेसच्या पराभवाची सुपारी घेतल्याची जोरदार चर्चा आहे...ही बाब काँग्रेसच्या काही जिल्हाध्यक्षांनी खासगीत मान्य केली म्हणत्यात...