डॉक्टर तुमच्या दारी! बुलढाण्यात रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. शरद साळोखे यांची सुपरस्पेशालिटी ओपीडी उद्या! गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, कोणतेही दुखणे असेल तर उद्या भेटाच....
Apr 10, 2026, 18:04 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच सांध्यांच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बुलढाण्यात उद्या (दि. ११ एप्रिल) विशेष संधी उपलब्ध होणार आहे. पुण्यातील नामांकित लोकमान्य हॉस्पिटल्सतर्फे रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. शरद साळोखे यांची सुपरस्पेशालिटी ओपीडी आयोजित करण्यात आली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, विशेषतः रोबोटिक पद्धतीने गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात डॉ. साळोखे यांना विशेष प्राविण्य आहे. गुडघेदुखी, गादी (डिस्क) फाटणे, खुब्याचे विकार, पायाला बाक येणे, पाठदुखी, कंबरदुखी तसेच चालताना होणारा त्रास यांसारख्या समस्या असलेल्या रुग्णांना या ओपीडीचा लाभ घेता येणार आहे. तसेच लिगामेंट इन्जुरी व खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींवरही तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे.
ही विशेष ओपीडी बुलढाणा येथील लद्धड हॉस्पिटल, वानखेडे लेआउट, सुवर्ण नगर, गजानन महाराज मंदिराच्या मागे येथे दुपारी २.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णांना पुण्यासारख्या महानगरात न जाता स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन मिळणार असल्याने ही संधी महत्त्वाची मानली जात आहे. इच्छुक रुग्णांनी आगाऊ नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिन पवार 9673859185 (काउन्सेलर) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.