देऊळगाव राजा शिंदेसेना राडा प्रकरण! शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी म्हणाले, हा आमचा....
Updated: Apr 17, 2026, 19:12 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत दोन दिवसांपूर्वी प्रचंड गटबाजी उफाळून आली होती. लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्यासमोरच दोन गट आमने सामने भिडले होते. या गटबाजीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. माजी आ.खेडेकर आणि खा. प्रतापराव जाधव यांचे समर्थक अशी उघड उघड गटबाजी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे..दरम्यान या विषयावर शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांनी मात्र आमच्यात कोणतीही गटबाजी नसल्याचे सांगितले आहे..
जिल्हाप्रमुख बळीराम मापारी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले की, आढावा बैठकीत जे झाले ते व्हायला नको होते..मात्र त्याचा जेवढा बाऊ माध्यमांमधून करण्यात येत आहे तसे ते प्रकरण मोठे नाही. आढावा बैठकीचा काही माजी पदाधिकाऱ्यांना निरोप नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे म्हणणे मी स्वतः आणि संपर्कप्रमुखांनी ऐकून घेतल्याचे बळीराम मापारी म्हणाले. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे..घरातला विषय आम्ही चर्चेने सोडवू. खा.जाधव आणि माजी आ.खेडेकर एक दिलाने शिवसेना वाढवण्यासाठी काम करत आहेत, काम करत राहतील असेही बळीराम मापारी म्हणाले..