कृषी कार्यालयाला ‘वंचित’चा इशारा; १० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा...
विशेषतः महाडीबीटी (mahadbt) अंतर्गत ट्रॅक्टर, रोटावेटर, कटर मशीन यांसारख्या कृषी अवजारांसाठी शेतकऱ्यांना पूर्वसंमतीच न मिळणे, तसेच पूर्वसंमतीत दोन लाख रुपयांची सबसिडी दर्शवून प्रत्यक्ष अंमलबजावणीत केवळ एक लाख रुपये देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. या घोळामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून कृषी खात्याच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या सर्व मागण्या येत्या १० दिवसांत पूर्ण न झाल्यास कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात किशोर भिडे (तालुकाध्यक्ष), आशीष धुंदळे (युवा तालुकाध्यक्ष), आत्माराव वसुलकर काका, नंदकिशोर पुंडे (तालुका महासचिव), दीपक पहुरकर (तालुका महासचिव), श्रीकृष्ण भालतिडक महाराज, रत्नाकर भिलंगे, राहुल भिलंगे, राहुल सुरडकर, बाळकृष्ण बोदळे, सचिन शेगोकार, कालूभाई, छायाताई बोदळे (तालुकाध्यक्ष महिला आघाडी), विकांत सपकाळ, सिद्धार्थ बोदळे, रोशन मिर्झा, अंबादास नगराळे, शेषराव वानखडे, संदेश वाकोडे, साहील शेख, निर्मलाताई घुले, लक्ष्मीबाई इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आता तरी कृषी प्रशासन जागे होणार की पुन्हा आश्वासनांच्या ढिगाऱ्यात हे प्रश्न गाडले जाणार? — असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.