मोताळा तालुका बुलढाण्याशीच संलग्न ठेवण्याची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांची विजयराज शिंदे यांनी घेतली भेट...
१४ जुलै २०२६ रोजी मंत्रालयात झालेल्या या भेटीदरम्यान मोताळा तालुक्याची भौगोलिक निकटता, प्रशासकीय सुसंगती तसेच नागरिकांची होणारी सोय लक्षात घेता तालुका पूर्ववत बुलढाणा येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न ठेवण्याची मागणी करण्यात आली. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक प्रभावी राहील तसेच विविध शासकीय कामकाजासाठी नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार विजयराज शिंदे यांनी दिली. मोताळा तालुका बुलढाण्याशीच संलग्न राहावा, ही स्थानिक नागरिकांची दीर्घकालीन मागणी असून या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.