मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात बुलडाण्यात
Jul 1, 2023, 11:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर आज मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून थोड्याच वेळात दोघेही घटनास्थळी पोहचणार आहे.
ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्याने २५ जणांचा मृत्यू झालाय. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा जिल्ह्यात दाखल झाले असून ते घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. अपघात मृत पावलेल्या २५ जणांची मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.