बुलढाणा नगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३१ ऑगस्टपर्यंत घेता येणार हरकत; १ ते ८ सप्टेंबरदरम्यान हरकतींवर सुनावणी; ३० सप्टेंबरला हाेणार अंतिम प्रभाग रचना जाहीर!
राजकीय हालचालींना वेग
प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे गट सक्रिय झाले आहेत. नागरिकांच्या हरकती आणि सूचना ३१ ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यानंतर सुनावण्या पार पडून ३० सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. या घडामोडींमुळे पालिका निवडणुकीतील सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.
आमदार गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीत युती होणार की पक्ष स्वतंत्र रिंगणात उतरणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. स्थानिक पातळीवरील नाराजी, कार्यकर्त्यांचे समीकरण आणि मतदारांचा कल हा गायकवाड यांच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारा ठरणार आहे.