"बुलडाणा लाइव्ह" चा दणका! न्याय मिळाला; मुजोर "एमओ" वठणीवर आला; कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहाय्यकाला मेडिकल बिल मिळाले....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुजोर एमओ अखेर वठणीवर आला आहे..१८ दिवसांपासून कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहायकाचे वैद्यकीय बिल अडवून ठेवलेल्या "एमओ" ने बुलडाणा लाइव्ह च्या दणक्यानंतर मेडिकल बिल अदा केले आहे. पीडित कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहाय्यकांनी बुलडाणा लाइव्ह ला धन्यवाद दिले आहेत..

 

बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील मेडिकल ऑफिसरने वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी ३० हजार मागितल्याचा आरोप कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहाय्यकाने केला होता. ३० हजार रुपये कारंजा चौकातील शिवकृपा मोबाईल शॉपीवर ठेवून द्या, तेव्हाच सह्या करतो असा निरोप तवर नावाच्या कनिष्ठ सहाय्यकाच्या मार्फत एमओ ने पाठवला होता. पीडित कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहायकांनी पुराव्यानिशी ही बाब बुलडाणा लाइव्ह ला कळवली. त्यानंतर त्याबाबतचे वृत्त काल सायंकाळी "बुलडाणा लाइव्ह" ने प्रकाशित केले होते. या बातमीनंतर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या बातमीनंतर मेडिकल बिल अदा करण्यासाठी पैसे मागणारा एमओ वठणीवर आला असून आज ,१९ डिसेंबरला पीडित कॅन्सरग्रस्त कनिष्ठ सहायकांना शासनाकडून मंजूर झालेले १४ लाख ८४ हजार रुपये मिळाले आहेत...

दरम्यान असे असले तरी या "एमओ" च्या  आणखीही बऱ्याचश्या तक्रारी आहेत. एका महिला कर्मचाऱ्याने देखील या एमओ ची तक्रार केलेली आहे. आता जिल्हा आरोग्य अधिकारी याबाबत चौकशी करून काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे...